सप्तश्रृंग गडावर आल्यावर उजवीकडे देवीच्या मंदिराकडे जाण्याचे प्रवेशद्वार आहेत. येथून ५०० पाय-या चढून वर गेल्यावर डोंगराच्या कपारीत ८ फूट उंचीची शेंदूरचर्चित रक्तवर्णीय अशी महामाय स्वयंभू सप्तश्रृंग मातेचे दर्शन घडते. जगदंबेचे दर्शन झाल्याबरोबर मन प्रसन्न होते. भक्तांचा थकवा नाहीसा होतो. श्री भगवतीचे १८ हात असून तिला अष्टभुजा असेही म्हणतात. प्रत्येक हातामध्ये तिने वेगवेगळे आयुधे धारण केलेली आहेत. श्री भगवतीचे मूर्ती ८ फूट उंचीची असल्याने तिला अकरा वार साडी लागते व चोळीला तीन खण लागतात. डोक्यावर मुकुट, कानात कर्णफुले, नाकात नथ, गळयात मंगळसुत्र व पुतळयाचे गाठले, कमरेला कमरपट्टा, पायात तोडे असे अलंकार अंगावर घालण्यात येतात.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा