शनिवार, ११ जानेवारी, २०१४

सप्तश्रृंगी गड एक तपोभूमी
श्री क्षेत्र सप्तश्रृंगी ग़ड स्थान महात्म्य
सप्तश्रृंगी गडावर अनंत कालापासून महामाया आदीशक्त्तीचे वास्तव्य आहे.तिच्या दर्शनासाठी व मनोवांछीत फलप्राप्तीसाठी
अनेक थोर तपस्वी , महामुनी , संत , महंत, आणि भक्त गडावर आल्याचे उल्लेख आढळतात.
प्रभु रामचंद्र वनवासात असतांना काही दिवस नाशिक पंचवटी येथे थांबले असताना सितामाई सोबत श्री. भगवतीच्या दर्शनास आल्याचा उल्लेख आढळतो.सप्तश्रृंग गड हा पुर्वी दंडकारण्याचा भाग होता. मार्कण्डेय ऋषी , पाराशर ऋषी ई. याच ठीकाणी तपश्चर्या केल्याचा उल्लेख आढळतो. संत गाडगे महाराज ही समाज प्रबोधन करत करत गडावर थांबल्याचा उल्लेख आहे. देवीचे परमभक्त संत दाजीबा महाराज यांचेही गडावर वास्तव्य होते. त्यांचे शिष्य पट्टेकर महाराज हे सप्तश्रृंग देवीचे परमभक्त होते. त्यांच्याच प्रेरणेने देवस्थानाने दाजीबा महाराजांच्या समाधी मंदीराचा जिर्णोद्धार केला आहे.
ज्ञानेश्वरांची कुलस्वामिनी ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामधील एका ओवीत संत ज्ञानेश्वरांचे पिताजी विठ्ठलपंत सप्तश्रृंग गडावर आपल्या कुलदेवतेचे दर्शन घेण्यासाठी गेले होते.तिथे भट्टाचर्यांवर हल्ला करुन बेजार करुन टाकले.संत निवृत्तीनाथांच्या भजन मालिकेत पहिल्या सात अभंगात संत नामदेवांनी सधु संतांच्या नात्या गोत्यांचे वर्णन केले आहे.संत निवृत्तीनाथ पांडुरंगाची आळवणी करताना म्हणतात
आता खरे चला तुम्ही सप्तश्रृंगा|
कार्य पांडुरंगा कार्य सिद्धीस न्यावे ॥
सप्तश्रृंग माता ही निवृत्तीनाथा कुलस्वामिनी,संत ज्ञानेश्वर नामदेव व मुक्ताबाई या लहान भावंडांनी त्या पुर्वीच समाधी घेतली होती. सहाजिकच निवृत्तीनाथांना समाधी घेण्याची घाई झाली म्हणुन तीन दिवस गडावर येउन ध्यानस्त बसले. शिव अवतारी हा संत भगवतिची परवानगी घेण्यासाठी गडावर आला होता. निवृत्तीनाथांची हाक ऐकुन पांडुरंग गरुडावर आरुढ होउन गडावर आले होते.याचा उल्लेख ही शके बाराशे बारोत्तरीत आहे.या योगिनीची परवानगी घेउन संत निवृत्तीनाथ शेवटी त्र्यंबकेश्वरी जाउन समाधीस्त झाले.
Share:

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा