शनिवार, ११ जानेवारी, २०१४

गडावरील पवित्र तीर्थ
1.कालीकुंड व सुर्यकुंड
पुर्वी सप्‍तश्रृंग गडावर 108 कुंडे असल्‍याचा उल्‍लेख आहे.सध्‍या प्रत्‍याक्षात 10 ते 15 कुंडे दिसतात. बाकीची कुंडे बुजली असावीत. गडावरून पुर्व दिशेने गेले की मारूतीचे मंदिर व थोडे पुढे गेले की दाजीबा महाराजांच्‍या समाधी लागते. दाजीबा महाराजांच्‍या समाधीपासुन जवळ्च सुर्यकुंड व कालीकुंड हे लागतात. ही दोन कुंडे पेशवेंचे सरदार छत्रसिंग ठोके यांनी बांधली. याच कुंडाचा पाण्‍याचा वापर श्री. भगवतीच्‍या दैनंदीन स्‍नानासाठी केला जातो.
2. जलगुंफा
या नावाने एक तिर्थ खाली कपारीत आहे. ते नैसर्गिक पर्वत पोखरणीत आहे. ती पोखरणी देवीच्‍या पायापासुन उगम पावली. असे म्‍हणतात ते‍थे भंयकर अंधार असल्‍यामुळे पाण्‍याचा किती थांग आहे हे सांगता येणार नाही. पोखरणीचे मुख पुर्वेकडे असल्‍यामुळे सकाळच्या सूयकिरणांनी अधुंक उजेड पडतो. तिर्थावरील पाणी बफासारखे थंड आहे. तसेच यात तीन डोळयांचा मासा असून त्याच्या स्पशाने लोखंडाचे सुवण होते असे सांगितले जाते. तसेस असेही सांगितले आहे की, या पर्वतावर आणखी एक विचित्र वृक्ष आहे. त्याची पाने काशाच्या स्पशाने मृतीकामय होतात. तिचे पाणी पाच प्रहरापर्यंत ठेऊन अग्नीचा स्पर्श केला म्हणजे त्याचे रोप बनते. जलगुंफेतील या तीर्थास मछतीर्थ असेही म्हणतात.
३. शिवतिर्थ
सप्‍तश्रृंग गडाच्या दक्षिणेस शिवालय नामक एक पुण्यकारक तिर्थ आहे. हेच ते गिरीजातिर्थ व शिवतीर्थ होय. पूर्वी याचे बांधकाम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केले. परंतु त्याची पडझड झाल्याने ट्रस्टने त्याचा नुकताच जिर्णोध्दार केला असून तेथे स्नानाबरोबरच वस्त्रांतर गृहाची व्यवस्था केली आहे. या कुंडात स्नान केल्यास विविध तापापासून मुक्तता मिळते, अशी भाविकांची श्रध्दा आहे. या तिर्थात सर्व देवांनी स्नान करुन जो कोणी पिंड श्राध्द करील तो पितरासहित जगदंबा स्वरुपास प्राप्त होईल. तिर्थाजवळ आणखी एक हेमाडपंथी सिध्देश्वर मंदिर आहे. जवळच एक मारोतीचे मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरच लाकडी खांबाची जागा आहे. येथे पूर्वी मल्लखांब होता. मल्लखांबाचे मुळ स्थान हेच आहे. मल्लविद्येचे गुरु बाळंभट दादा देवधर यांना श्री मारुती या विद्येचे येथे धडे दिले व येथूनच मल्लखांब विद्या पुढे सुरु झाल्याची उदाहरणे सापडतात.
४. तांबुलतिर्थ
सप्‍तश्रृंग देवीच्या मागील बाजूला थोडे उत्तरेकडे एक अष्टकोनी कुंड आहे. या पाण्याचा रंग तांबडा आहे. देवीने पानाचा विडा खाउन या बाजूला टाकल्यामुळे पाणी व जमिनीचा काही भाग तांबडया रंगाचा झाला. त्यामुळे या तिर्थाला तांबूल तिर्थ असे म्हणतात. तसेच एक काजल तिर्थ आहे. याचे पाणी काळे आहे. देवीने काजळ घातलेले डोळे येथे धुतले म्हणूण यास काजळ तीर्थ असे म्हणतात. शिवालया तलावाच्या पश्चिमेस गंगा यमुना नावाची दोन कुंडे शेजारी-शेजारी आहेत. यमुना कुंडाचे पाणी काळेभोर व रुचकर आहे. या कुंडापासून थोडे दक्षिणेस गेल्यास पूर्वाभिमुख गणपती मंदिर आहे. पूर्वी वणी कडून गडावर येण्यासाठी याच दगडी पाय-यांच्या मार्गाने गडावर येऊन गणेश मंदिराजवळ विश्रांतीसाठी थांबत असत. येथे पण दगडाचा कोरीव कोरलेले पाण्याचे तळे असून त्याचा वापर पिण्यासाठी करीत असत.
५. मार्कंण्डेय दर्शन
सप्‍तश्रृंग परिसर अनेक पवित्र ठिकानांनी पवित्र झाला आहे. त्यात मार्कंण्डेय ऋषिंचा उल्लेख महत्वाचा ठरतो. सप्‍तश्रृंगीचे मुख पुर्वेकडे आहे. तेंव्हा समोरील मार्कंण्डेय डोंगर नजरेत भरतो. मार्कंण्डेय भृगृ वंशातील त्रेता युगात झाले. प्रारंभी ते अल्पायुशी होते, परंतु सप्तर्षींचे आशिर्वादाने दिर्घायु झाले. धर्मराज वनवासात असताना मार्कंण्डेय ऋषींनी त्याला अनेक वृतांत कथन केले. कल्पातीच्या वटवृक्षाचे व प्रलयाचे दर्शन मार्कंण्डेय ऋषींना झाले होते. वयाचे साठ वर्ष पूर्ण झाल्यावर दिर्घायुष्य प्राप्तीसाठी जी शांती करतात तिच्यात प्रमुख देवता मार्कंण्डेय हीच असते. याच गडावर मार्कंण्डेय ऋषीं आसनस्थ होऊन देवीला तिच्या पराक्रमाचा कथा ऐकवत व देवी किंचित मान वाकडी करुन ऐकत असे. मार्कंण्डेय ऋषी चिरंजीव होऊन सर्व देवात श्रेष्ठ ठरले.
६. शितकडा
याला सतीचा कडा असेही म्हणतात. शिवालय तिर्थापासून थोडयाच अंतरावर शितकडा नावाची दरी आहे. ही दरी सुमारे १२०० फूट खोल असून हा कडा खूप ऊंच व सरळ आहे. या कडयाचा वापर बलिदानासाठी उपयोगी होईल. गडावर काही संकट आल्यास काही होऊ नये म्हणूण तेथे पशू बळी देण्याची पध्दत होती. याला भाग देणे असे म्हणत. तसेच देवीची कृपा व्हावी म्हणूण या कडयावरुन लोटून बळी दिला जाई. या कडयाबद्दल एक विचित्र अख्यायिका आहे. फार फार वर्षापूर्वी एका बाईने नवस केला होता की, तिला जर मुलगा झाला तर ती मुलासह सप्‍तश्रृंग गड चढून येणार होती व मुलासह दर्शन घेऊन देवीला नमस्कार करुन बैलगाडीतून शितकडा उतरणार होती. शितकडा म्हणजे कुठलीही वस्तू कडयावरुन खाली टाकली तर तिचे भाताच्या शिता सारखे तुकडे तुकडे होणे. देवी बाईच्या इच्छेप्रमाणे नवसाला पावली व बाईला मुलगा झाला. नवस फेडण्यासाठी ती बाई आपल्या मुलाला घेऊन गाडीत बसली. आपल्या नव-याला तिने गाडी शितकडयावरुन नेण्यास सांगून मी केलेला नवस फेडावयाचा आहे. असे सांगितले. तिचा नवरा तयार होईना. शेवटी त्या बाईचा घरगडी बैलगाडी चालविण्यास तयार झाला. सर्वांनी देवीची करुणा भाकली. घरगडी, बैलगाडी, बाई व मुलगा कडयावरुन सुखरुप खाली उतरले. हा भयास नवस देवीने बाईकडून फेडून घेतला. आजही शितकडयावर गाडीच्या चाकोर्या दिसतात. या कडयाच्या वरच्या बाजूस वा-याचा झोत मोठा असतो. सध्या येथे कडयाचा वरील भाग कुंपन घालून सुरक्षित केलेला आहे. हा कडा पवित्र समजून लोक दर्शन घेतात.
Share:

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा